हिंदू हिंसक नसतात का? रामदेवबाबा म्हणाले…

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवस उरले असतानाच वादग्रस्त विधानांचे प्रमाण वाढले आहे. यातच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी हिंदू हिंसक नसतात हे कसे? असा सवाल उपस्थित केला होता. यावर योगगुरू रामदेवबाबा यांनी सीताराम येचुरी यांच्यावर टीका केली की,’ कम्युनिस्ट, ख्रिश्चन आणि मुघल यांच्या शासन काळात जे निर्दोष लोक मारले गेले त्या प्रशासनाला हिंसक बोलण्याची हिंमत सीताराम येचुरी करतील का? असा प्रश्नाद्वारे टीका केली आहे.

तत्पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट (सीपीआयएम) पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी हिंदू हिंसक नसतात हे कसे? असा सवाल उपस्थित केला होते. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’त हिंसक घटना आणि युद्धाचा उल्लेख आहे. संघाचे प्रचारक म्हणून ही बाजू सांगितलीच जात नाही, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे महाकाव्य असल्याचे सांगितले जाते. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’चे दाखले दिल्यानंतरही हिंदू हिंसक नसल्याचा दावा केला जातो. एका विशिष्ट धर्माचे लोकच हिंसा करतात, हिंदू हिंसा करत नाहीत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘रामायण’-‘महाभारता’तही हिंसा आहे, मग हिंदू हिंसक नसतात हे कसे?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.