तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही : राऊत

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेने कडाडून विरोध केला. या मुद्यावर काही पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत कडाडून हल्ला चढवला. पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिोस्तानातून आलेल्या निर्वासितांकडे धार्मिक नव्हे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर आमच्या हिंदुत्वप्रेमाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले.

याविधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आहेत. आणि समर्थन करणारे देशभक्त आहेत, असा प्रचार केला जात आहे. त्यावर राऊत यांनी टीकेची झोड उठवली. काश्‍मीरमध्ये बलिदान केलेल्या दोन शहीद जवानांच्या कुटुंबियांनी या विधेयकाल विरोध दर्शवला आहे. शहिदांच्या कुटुंबियांना तुम्ही देशद्रोही ठरवणार का? असा सवाल त्यांनी केला. आमहीही या देशाचे नागरिक आहोत. आम्हा सर्वांना जनतेने मते दिली आहेत. ही काही पाकिस्तानची संसद नाही. आमच्या मजबूत सरकारला पाकिस्तानचा एवढा द्वेष असेल पाकिस्तानला संपवून टाकले पाहिजे.

ईशान्य भारतातील नागरिकही या विधेयकाला विरोध करत आहेत. तेही देशाचे नागरिक आहेत. तेंव्हा देशभक्‍तीची कोणी प्रमाणपत्रे वाटत फिरायची गरज नाही. आम्ही किती कडवे हिंदुत्ववादी आहोत, याची सगळ्यांना कल्पना आहे. आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे ते म्हणाले

शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठींबा दिला. मात्र कॉंग्रेसकडून याबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका राज्यसभेत बदलली. तमिळ निर्वासित आणि 25 वर्ष मतदान करता येणार नाही अशी तरतूद यात करावी या मागणीवरून शिवसेना या विधेयकाला आक्रमक विरोध करत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)