व्हाईट हाऊसबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे निवासस्थान आहे. व्हाईट हाऊस हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते. मात्र यासोबतच हे एक झपाटलेले ठिकाण असल्याचेही मानले जाते. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त एक अदृश्य शक्ती देखील आहे. या घरात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे भूत राहत असल्याचे सांगितले जाते.
व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या संख्येने सैनिक आणि पोलिस नेहमीच तैनात असतात. आता हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हाईट हाऊसमध्ये चक्क भुतेही राहत असल्याचा अनेक लोकांनी दावा केला आहे. येथे राष्ट्राध्यक्षांसोबत भुतं देखील राहत असून व्हाईट हाऊसमध्ये त्याच्यासोबत अनेक रहस्यमय घटना घडल्याचा लोकांचा दावा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये आज घडणाऱ्या घटनांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर, जाणून घेऊया ही रंजक माहिती.
1865 मध्ये अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अनेकांनी त्यांचा आत्मा पाहिल्याचा दावा केला आहे. याला एक रंजक कथा जोडलेली आहे. असे म्हटले जाते की नेदरलँडची राणी विल्मिना या व्हाईट हाऊसमध्ये बराच काळ थांबल्या होत्या. रात्री अचानक त्यांच्या दारावर कोणीतरी टकटक केली. यानंतर, जेव्हा राणीने दार उघडले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले, कारण त्यांच्यासमोर साक्षात अब्राहम लिंकन उभे होते. यानंतर त्या खूप घाबरल्या. अमेरिकेच्या प्रेसिडेंट हाऊसमध्ये केवळ अब्राहम लिंकनच नाही तर इतर राष्ट्राध्यक्षांचे आत्मेही फिरत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडम्स यांचा आत्माही येथेच राहत असल्याचा दावा अनेक लोक करतात. जॉन अॅडम्स यांनी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात मोलाची भूमिका बजावली होती. व्हाईट हाऊसमध्ये राहणारे बरेच लोक असा दावा करतात की त्यांची चाल आणि पोशाख हे सूचित करते की तो जॉन अॅडम्स यांचाच आत्मा आहे. व्हाईट हाऊसशी संबंधित या रहस्यमय घटना केवळ दावे आहेत. या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे कोणालाच माहीत नाही. याबाबत अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत. आतापर्यंत व्हाईट हाऊसशी संबंधित या घटना केवळ एक रहस्य आहे.