टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिरंदाजी गटात भारताचा नवोदित तिरंदाज प्रवीण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला पराभूत करत कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी केली. मात्र, त्यानंतर त्याला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रवीणने जागतिक तिरंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हवर मात करत स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला.
प्रवीणने ही कामगिरी पहिल्या फेरीत केली व त्यानंतरचे दोन सामने पदकासाठी जिंकणे त्याच्यासाठी अत्यावश्यक बनले होते. मात्र, अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रवीणला सलग दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला.