Archana Puran Singh | बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन अर्चना पूरण सिंह आपल्या विनोदी शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र अर्चनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या सेटवर अर्चना जखमी झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. अर्चना पूरन सिंहने दुखापती बद्दल सर्व माहिती तिच्या यूट्यूब व्हिडीओमध्येही सांगितली आहे.
अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अर्चना पडली आणि तिच्या हाताला फॅक्चर झाला आहे. अर्चना पूरन सिंह राजकुमार राव सोबत फिल्मचे शूट करत होती, तेव्हा ही घटना घडली. अर्चना व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, “जो होता है अच्छे के लिए होता है… मी यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी ठीक आहे. नेहमीप्रमाणेच सकारात्मक आहे. फक्त एका हाताने काम करताना किती त्रास होतो आणि अडचणी येतात हे आता मला समजत आहे.” आईची अवस्था पाहून तिचा मुलगा भावूक झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. Archana Puran Singh |
View this post on Instagram
अर्चनाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दुखापतीनंतर अर्चनाने राजकुमार रावला कॉल करून प्रोडक्शनमध्ये उशीर होत असल्याने त्याची माफी मागितली आहे. तसेच लवकरच बरी होऊन अर्चना शूटिंगला परतणार आहे. Archana Puran Singh |
हेही वाचा: