दीडशे वर्षांपूर्वीच्या चित्रांतून उलगडणार राजगडाचे गतवैभव

ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेले चित्र पुण्यात उपलब्ध : पुरातत्त्व खात्याला पुनर्बांधणीसाठी होणार मदत

पुणे – स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाचे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेले तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचे चित्र पुण्यात उपलब्ध झाले आहे. वडगाव बुद्रुक येथील गडकिल्ले संवर्धन समितीच्या संशोधनातून ही चित्रे उपलब्ध झाली असून, अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच संशोधन असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. या चित्रांच्या माध्यमातून पुरातत्त्व खात्याला राजगडाची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याची माहिती, समितीचे प्रसाद दांगट पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटील म्हणाले, “दुर्ग संवर्धनासंदर्भात उपयुक्‍त ठरतील, असे काम कारायचे समितीच्या सदस्यांनी ठरविले. त्यानुसार समितीने किल्ल्यावरील वास्तुंच्या बांधणीचा अभ्यास, त्यांची मोजमाप, या माध्यमातून संवर्धन चळवळीला वेगळी दिशा दिली आहे. गेली दोन वर्षे गडकिल्ले संवर्धन समिती, किल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून पुनर्बांधणी संदर्भातील दुर्मिळ ऐतिहासिक पुरावे शोधण्याचे काम, भारतात तसेच भारताबाहेर करीत आहे. यातूनच भारतातील तसेच भारताबाहेरील शेकडो पुस्तके, हजारो रुपये खर्च करून संग्रहित केली आहेत. तसेच इंटरनेटच्या माध्यमातूनही बरीच पुस्तके संग्रहित करण्यात आली आहेत. समितीतर्फे ही दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेली भेट आहे. या माध्यमातून गड-किल्ल्यांचे गतवैभव पुन्हा आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांने सांगितले. यावेळी समितीच्या संशोधन विभागातील सदस्य प्रवीण कांबळे, राहुल पवार, रत्नेश किणी उपस्थित होते.

भेटीचे “गुड वर्डस’ मासिकात प्रवासवर्णन

किल्ल्याचे हे स्केच 1859 ते 1866 च्या दरम्यान होनोरेबल ईस्ट इंडिया कंपनी सर्विस पुणे येथे कार्यरत असलेल्या “रेवनंट फ्रांसिस गेल’ या ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेले आहे. या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील किल्ले सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड, पुरंदर येथे भेट दिली होती, याच दरम्यान याने हे स्केच काढलेले आहे. किल्ल्यांवर भेट दिल्यानंतर त्याने त्या भेटीचे प्रवासवर्णन “गुड वर्डस’ नावाच्या मासिकात केले आहे. त्याच बरोबर त्याने किल्ले राजगड, बाले किल्ला तसेच किल्ले रायगड आणि पुरंदरचेही स्केच त्या मासिकात दिले आहे.

या संशोधनामधून होणारे काम :
– राजगड बालेकिल्याचा लाकडी दरवाजा.
– दरवाज्यावरील तीन ते चार फुट उंचीचे बांधकाम.
– दरवाजाच्या बाजूला असलेले बुरुज
– बालेकिल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्या
– बालेकिल्ला चढताना सुरुवातीचा लाकडी दरवाजा
– या दरवाजाच्या बाजूचे बांधकाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)