AR Rahman | प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान मागील काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पत्नी सायरा बानो यांच्यापासून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा 29 वर्षांचा संसार मोडला असल्याने चाहत्यांना देखील धक्का बसला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर एआर रहमान करिअरमधून ब्रेक घेणार, असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. यावर आता त्यांची मुलगी खतिजा रहमान हिने भाष्य केले आहे.
एआर रहमान यांची लेक खतीजा रहमाननं तिच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट रिपोस्ट करत शेअर केली आहे. तिनं रिपोस्ट केलेल्या पोस्टमध्ये एआर रहमानचा स्टेजवर परफॉर्म करतानाचा फोटो असून ते इंडस्ट्रीतून ब्रेक घेणार असल्याचे म्हंटले आहे. त्यावर खतीजा रहमाननं ‘कृपया अशा अफवा पसरवू नका,’ असे आवाहन केले आहे.
गेल्या महिन्याच्या २० तारखेला रहमान यांनी त्यांच्या पत्नी सायरा यांच्यापासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यांनी लिहिले की, ‘आम्हाला आशा होती की आम्ही लग्नाची ३० वर्षे पूर्ण करू, परंतु असे दिसते की सर्व गोष्टींचा अदृश्य अंत आहे.’ याआधी त्यांच्या पत्नीच्या वकिलाचे घटस्फोटासंदर्भातील निवेदन समोर आले होते.
दरम्यान, रहमान यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या टीममधील एक सदस्य मोहिनी डे हिनेही तिच्या पतीपासून घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर रहमान आणि मोहिनी यांचे अफेअर असल्याचीही चर्चा झाली. रहमान यांच्या घटस्फोटाला मोहिनीला जबाबदार धरण्यात आले. मात्र दोघांनीही या चर्चा फेटाळल्या होत्या.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : भिगवण रस्त्यावर चारचाकी उलटली ; २ शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू