मुंबई- अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच मिळाला. लवकरच अपूर्वा ही झी युवा वरील तुझं माझं जमतंय या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र याच पम्मीच्या पात्राला किंवा अपुर्वाला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यावर अपुर्वा शांतपणे उत्तरली आहे.
दरम्यान, अपुर्वाची शेवंता ही भूमिका प्रचंड गाजली. आता पम्मीच्या भूमिकेची झलक पाहून एका नेटकऱ्याने तिला कमेंट मध्ये विचारलं की तुम्ही नेहमी बाहेरचीचाच रोल का करता… त्यावर अपुर्वाने शांतपणे उत्तरली… ती म्हणली, अजून सिरीयल सुरु पण नाही झाली आणि आधीच ठरवून मोकळे झालात.