खतांसाठी पोषक तत्त्व आधारित अनुदान दर निश्‍चितीला मंजुरी

नवी दिल्ली : 2020-21 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश युक्त खतांसाठी पोषक तत्त्व आधारित अनुदान दर निश्‍चितीला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.अमोनियम फॉस्फेट या मिश्र खताचा समावेशही पोषक तत्त्व आधारित अनुदान योजनेत करण्यासाठी आज मंजुरी देण्यात आली.

2020-21 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठीच्या अनुदानाकरीता 22,186.55 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खतांवरचे अनुदान,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजूर केलेल्या अनुदान दरानुसार खत कंपन्यांना देण्यात येईल.केंद्र सरकार प्रामुख्याने युरिया आणि फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांच्या 21 श्रेणी, शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करून देत आहे.

1- 4 – 2010 पासून फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठीचे अनुदान पोषक तत्त्व आधारित अनुदान योजने अंतर्गत देण्यात येते. केंद्र सरकार आपल्या शेतकरी स्नेही धोरणाला अनुसरून शेतकऱ्यांना माफक दरात फॉस्फेटिक आणि पोटॅश खते उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. दिलेल्या दरानुसार खत कंपन्यांना अनुदान दिले जाईल, ज्यामुळे या कंपन्या शेतकऱ्यांना माफक दरात खत उपलब्ध करून देतील.

प्रती किलो अनुदान दर ( रुपयात)
एन- 18.789
पी -14.888
के – 10.116
एस -2.374

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.