नवी दिल्ली: दिल्ली सरकारने महिलांना रेल्वे आणि मेट्रोमधून मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्या विषयीच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तथापि या निर्णयामुळे दिल्ली सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांचा अता वाहतूक भत्ता मात्र हिरावला जाणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणातील हा महत्वाचा टप्पा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. डीटीसीच्या दिल्ली क्षेत्राच्या परिसरातील सर्व बस सेवांमधून आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यात नॉयडा सारख्या उत्तरप्रदेश किंवा हरियानांतील भागाला जोडणाऱ्या बस सेवांचाहीं समावेश आहे. डीटीसी क्लस्टर बस सेवेत 5500 बसेस आहेत. ही बस सेवा मल्टि मोडल ट्रान्झिट सिस्टीमला जोडली गेलेली आहे. दिल्लीत एकूण 45 लाख प्रवासी दररोज या सेवाचा लाभ घेत असतात. दिल्ली मेट्रोने मात्र अजून राज्य सरकारच्या या योजनेला मान्यता दिलेली नाही.