शेवगाव – ग्रामविकास विभागांतर्गत लेखाशीर्ष 25/15 अंतर्गत शेवगाव पाथर्डी मतदार संघासाठी 5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकाजाताई मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे त्यासाठी झालेल्या विशेष सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. मतदारसंघात मंजूर झालेली कामे अशी- चापडगाव येथील बाजारतळ विकसित करणे (रु.10 लक्ष), शेकटे खु बाळूबाई तांडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु. 40 लक्ष), बालमटाकळी, विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), भातकुडगाव नजनवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु. 30 लक्ष), वरूर, वावरे वस्ती (खरडगाव रोड) खडीकरण व डांबरीकरण करणे (रु. 30 लक्ष), आखतवाडे, रामनगर येथे सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), हातगाव व राम मंदिर समोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), अंतरवाली खु. ने ग्रा.प. घोटण येथे चार हायमास बसविणे (रु. 2 लक्ष), अंतरवाली खु. येथे मुख्य प्रवेशद्वार कमान बांधणे (रु. 3 लक्ष), रावतळे ग्रा.प. कुरुडगाव येथे हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), गदेवाडी – साखरेवस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे (रु. 20 लक्ष), गदेवाडी- मडके वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे (रु. 10 लक्ष), बालमटाकळी, देशमुख स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (रु. 10 लक्ष), मौजे कांबी, दत्ता मंदिर ते दलितवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (रु. 15 लक्ष), मडके, लोखंडी पूल ते पांडुरंग वडघणे वस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (रु. 6 लक्ष), खडके, विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), सुलतानपूर खु. (फलकेवाडी), विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), वडुले बु, गणपती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे (रु. 2 लक्ष), अंतरवाली खु. महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), बऱ्हाणपूर, वैष्णव सेवा आश्रम समोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), वडुले बु,- साठे चौक ते गणपती मंदिर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (रु.10 लक्ष), गायकवाड जळगाव – हरळ वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु.25 लक्ष), एरंडगाव भागवत, विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), एरंडगाव समसूद, विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), लाडजळगाव- ढाकणे वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे (रु. 8 लक्ष), घोटण, बाजारतळ व टाकळकर वस्ती येथे हायमॅक्स बसविणे (रु.1 लक्ष), याप्रमाणे शेवगाव तालुक्यातील कामांना मंजुरी मिळाली आहे.
त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील करोडी, तारकेश्वर पठार मार्गे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु.15 लक्ष), मोहोज देवढे, देवी मंदिर रस्ता रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु.10 लक्ष), जवखेडे खालसा- मतकर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु.30 लक्ष), निपाणी जळगाव- हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), पिंपळगाव टप्पा- दत्त मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 15 लक्ष), तांबेवाडी = सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), औरंगपुर- बाबासाहेब किलबिले वस्ती, रस्ता कॉंक्रीटीकरण व पूल बांधणे (रु.20 लक्ष), पिरेवाडी- पिरेवाडी फाटा ते पिरेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रु. 25 लक्ष), करोडी = जुने विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (रु.10 लक्ष), डमाळवाडी (पिरेवाडी) = मुस्लीम समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे (रु.10 लक्ष), पालवेवाडी (येळी) -दोन हायमास बसविणे (रु. 1 लक्ष), चिंचपूर इजदे, भगवान बाबा मंदिरा समोर सामाजिक सभागृह बांधणे (रु. 10 लक्ष), मोहटे,- चार हायमास बसविणे (रु. 2 लक्ष), खरवंडी, भगवान विद्यालय समोर पेव्हर ब्लॉक बसविणे (रु. 10 लक्ष) याप्रमाणे निधी मिळाला आहे.