मुंबईत प्लाज्मा पद्धतीने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास मान्यता

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून सरकारला मंजुरी

मुंबई : कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर मुंबईत प्लाज्मा पद्धतीने उपचार करण्यास  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने राज्य सरकारला मान्यता दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. गरजेप्रमाणे रुग्णांवर प्लाज्मा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातील प्लाज्मामध्ये या विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एँटिबॉडिज तयार असतात. त्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्या रुग्णांना होऊ शकतो, असे दिसून आले आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गंभीर बनलेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे अमेरिकेतील नियतकालिक ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स’ने म्हटले आहे. यालाच प्लाज्मा उपचार पद्धती म्हटले जाते.

कोरोना विषाणूमुळे झालेल्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराविरोधात लढल्यामुळे एँटिबॉडिज तयार झालेल्या असतात. रक्तातील महत्त्वाचा घटक असलेल्या प्लाज्मामध्ये या एँटिबॉडिज असतात. त्यामुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाज्मा कोरोनामुळे गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये वापरून त्यातून त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.