पिंपरी चिंचवड ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता

मुंबई – पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.1 ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी 946 कोटी 73 लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर 170 कोटी 3 लाख इतका खर्चाचा भार असेल. या मार्गिकेची लांबी 4.41 कि.मी. इतकी असून यात 3 स्थानके आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या 10 टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाचा एकूण 79 कोटी 4 लाख तसेच 90 कोटी 63 लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण 170 कोटी 3 लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी 2023 मध्ये 4.95 लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.