लॉकडाऊनच्या काळात दारू पिणारांची सोय; घरपोच दारू डिलिव्हरीला मान्यता, दिवसभर केला जाणार पुरवठा

रायपूर, दि. 9 – छत्तीसगड सरकारने दारूच्या घरपोच डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेस सरकारच्या या निर्णयावर राज्यातील भाजपने मात्र टीका केली आहे. लोकांना औषधे पुरवण्याऐवजी दारू पुरवण्यात सरकारची प्राथमिकता आहे असे यातून दिसते आहे असे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या कर विभागाने उत्पादनशुल्क आयुक्‍तांना दारूच्या होम डिलिव्हरीसाठी ही अनुमती दिली आहे. त्यानुसार लोक आता ऑनलाईन पद्धतीने मद्याची ऑर्डर नोंदवू शकतात. छत्तीसगडमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू असून त्यामुळे दारूची दुकाने बंद आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दारूची बेकायदेशीर विक्री व उत्पादन थांबेल व त्याच्या स्मगलिंगलाही आळा बसेल असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेतच हा पुरवठा केला जावा असेही बंधन यात घालण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळीही गेल्यावर्षी मे महिन्यात दारूच्या ऑनलाईन विक्रीला अनुमती देण्यात आली होती. या योजनेनुसार ग्राहक पाच लिटर मद्याची ऑर्डर करू शकतात व घरपोच दारू मिळण्यासाठी त्यांना शंभर रूपयांचा अतिरीक्त सर्व्हीस चार्ज घेण्याची अनुमती देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.