योगींच्या कार्याचे अमित शहांकडून कौतुक

लखनौ – केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज उत्तरप्रदेशातील फॉरेन्सिक सायन्स संस्थेचा पायाभरणी कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना अमित शहा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचा गौरव केला.

ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार जातीच्या आधारे काम करीत नाही. की कुटुंबातल्याच किंवा आपल्याशी जवळीक असलेल्या माणसांचीच कामे हे सरकार करीत नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार गरीबांच्या मूलभूत विकासाचे काम करते.

मी उत्तरप्रदेशच्या बऱ्याच भागात गेली अनेक वर्षे फिरलो आहे. या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीत कमालीची सुधारणा योगींच्या काळात झाल्याचे आपल्याला अनुभवायला येत आहे असे असे त्यांनी नमूद करीत योगींच्या काळात उत्तरप्रदेशात झालेल्या कामांचे कौतुक त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.