जामखेड – बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी आंधळेवाडीतील प्रगतशील शेतकरी कैलास मारुती आंधळे यांच्या शेतीची पाहणी केली आणि त्यांच्या शेती कार्याचे कौतुक केले आहे.
आंधळेवाडी व आष्टा येथे पोकरा योजने अंतर्गत शेडनेट, फळबाग, शेततळे, मत्स्यपालन, शेडनेट मधील भाजीपाला लागवड याची दि.६ फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा आंधळेवाडी येथे आहे होते. यावेळी त्यांनी प्रगतशील शेतकरी कैलास आंधळे व युवा शेतकरी राजेश कराड यांनी विविध योजनेतून घेतलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, बीडचे उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, प्रशांत पोळ, गणेश बारगजे, धर्मादाय अधीक्षक पोपटराव आंधळे, भाऊसाहेब आंधळे. सुखदेव सानप, रोहिदास आंधळे. राजाभाऊ मिसाळ, अमोल आंधळे, बाबासाहेब आंधळे, रावसाहेब आंधळे, तलाठी, कृषि अधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.
यावेळी शेती विषयी माहिती घेऊन शेडनेट मधील कलर कॅप्सी कम मिर्ची व द्राक्षे, पेरु बाग यांची पाहणी केली. तीन मोठे शेततळे उभारून याठिकाणी मत्स्यशेतीसोबतच, शेडनेट मधील शिमला मिरची, हिरवी-लाल-पिवळी मिरची, ठिबकवरील ऊस पिकाची स्थिती जाणून घेतली, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.