Bahraich News । अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे कौतुक करणे महागात पडले आहे. महिलेच्या पतीने तिच्यावर गरम डाळ फेकत तिला घटस्फोट दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी महिलेच्या पतीसह घरातील इतर सदस्यांना अटक केली आहे.
Bahraich News: नेमकं प्रकरण काय ?
या महिलेचे नाव मरियम आहे. तिने सांगितले की,माझे माहेर बहराइच गावात आहे. तर सासर फैजाबादमध्ये झाले. मी माझ्या कुटूंबासोबत पहिल्यांदाच अयोध्या फिरायला गेले होते. मी पहिल्यादांच शहर बघितले. यावेळी मला शहरातील विकास पाहून छान वाटले.
ती शहरात फिरायला गेली होती. यावेळी तिला अयोध्येतील रस्ते आवडले. तसेच तेथील वातावरण, सुशोभीकरण देखील आवडलं. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले. मी केलेले कौतुक ऐकून माझा नवरा संतापला आणि त्याने माझ्यासोबत भांडण सुरु केले. जेव्हा आम्ही घरी आले त्यावेळी त्याने मला मारहाण केली. माझा अंगावर गरम डाळ फेकली आणि मला घराबाहेर काढले. त्यानंतर त्याने मला घटस्फोट दिला. मी हे ऐकून बेशुद्ध पडले.
मी जेव्हा शुद्धीत आले मी स्थानिक पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करत पतीसह कुटूंबातील सदस्यांना अटक केली आहे.