मिलिटरी अफेअर्स विभागात ठाकूर, शंतनू यांची नियुक्ती

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स या विभागात ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीवसिंग ठाकूर आणि शंतून यांची जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर हे 1995 च्या तर शंतून हे 1997 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांची या विभागातील नियुक्ती 27 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. गेल्याच महिन्यात केंद्र सरकार मध्ये हा नवीन विभाग सुरू करण्यात आला असून सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग संपुर्ण भारतीय लष्कराचे नियंत्रण करणार आहे.

या खेरीज केंद्र सरकारने विविधविभागात 31 जॉईन्ट सेक्रेटरींच्याहीं नियुक्‍त्या केल्या असून त्याविषयीचा अध्यादेश आज जारी करण्यात आला आहे. गृहमंत्रालयात जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून आशुतोष अग्निहोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कॅबिनेट सचिवालयात भारत खेरा यांचीही जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here