लोणावळा (वार्ताहर) – लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदीदेखील निवड झाल्याने पक्षाचे प्रदेेश पदाधिकारी के.एम. बुक्तर व रमेश चिमूरकर यांनी वाघमारेे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा रिपब्लिकन पक्षाने ठरवुन दिलेला कारकिर्दीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
शिस्तबद्ध काम आणि यशस्वी कामगिरी पाहुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूर्यकांत वाघमारे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. सातारा येथे पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेमध्ये ही नियुक्ती करण्यात आली आहे.