स्कूलबस तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

विभाग व नेमणूक केलेले अधिकारी

पिंपरी –
उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी स्कूलबसची तपासणी करणे अनिवार्य आहे. दरवर्षी शाळांना सुट्टी लागल्यावर आरटीओ कार्यालयाकडून स्कूलबसची तपासणी केली जाते. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून बस मालकांना व शहरातील शाळांना स्कूलबसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तर, शहरातील विभागनिहाय शाळांच्या बसेसच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार 11 विभागात 22 कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणूक केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयी दक्षता म्हणून दरवर्षी स्कूलबसची परिवहन कार्यालयातून तपासणी करणे गरजेचे असते. यासाठी उन्हाळी सुट्टया लागल्यावर तपासणीसाठी वेळ दिला जातो. याबाबत उच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्यामुळे ही तपासणी दरवर्षी करुन घेणे बसमालकांना किंवा शाळांना अनिवार्य आहे. या तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडून नियुक्‍त करण्यात आलेले अधिकारी क्षिेत्रातील शाळांशी संपर्क करुन स्कूल बसची तपासणी झाली आहे की नाही? नियमानुसार आवश्‍यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे की नाही? याची खात्री करुन घेणार आहेत. तसेच शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना झाली की नाही याची खात्री करुन व समितीस प्रतिनिधी म्हणून हजर राहून याबाबतचा संपूर्ण अहवाल कार्यालयाला सादर करणार आहेत.

लोणावळा – तळेगाव – प्रविण आवाड, निगडी-आकुर्डी- प्रविण खेडाकर, पांडुरंग गाडेकर, थेरगाव-चिंचवड-स्मिता कोले, रुपेश गायकवाड, पिंपरी-चिखली-सचिन विधाते, गुलजार शेख, भोसरी-कासारवाडी- अजय कराळे, अविनाश दळवी, खेड-आळंदी-चाकण-दिपक भोंडे, शितल पवार, आंबेगाव-मंचर-घोडेगाव-रघूनाथ कानेकर, प्रसाद पवार, जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, ओतूर-एम.एन. पाटील, विकास माळवे, सांगवी दापोडी- उद्‌य इंगळे, संदीप गोसावी, वाकड-मुळशी-हिंजवडी- चंद्रकांत जवळकर, मंगेश बर्डे, अर्चना घानेगावकर, देहूरोड-ताथवडे-राकेश मठ आदी अधिकाऱ्यांची विभागनिहाय निवडी करण्यात आल्या आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here