मुंबई – राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी वैध ठरवण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायलयात ही याचिका लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तज्ज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. यात देशातील दिग्गज वकील कपिल सिब्बल यांची मराठा आरक्षणाचा खटला लढवण्यासाठी राज्य सरकारकडून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने कपिल सिब्बल यांना नवीन वकील म्हणून नियुक्त केले आहे. येत्या सर्वोच्च न्यायलयात मराठा आरक्षणची बाजू मांडणार आहे. मुकुल रोहतगी यांच्यासोबत कपिल सिब्बल आणि रफीक दादाही हा खटला लढणार आहेत. कपिल सिब्बल यांनी हा खटला लढावा, यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सकाळीच मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांनी मराठा आरक्षण उपसमितीशी चर्चा केली.
मराठा आरक्षणाबाबत 15 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात 7 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली होती. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपली बाजू ठोसपणे मांडली होती. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.