राष्ट्रपतींकडून 5 राज्याच्या राज्यपालांची नियुक्‍ती

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्‍यारी

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्‍ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्‍यारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाल संपल्याने कोश्‍यारी यांची या पदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट रोजी संपला आहे.

केरळच्या राज्यपालपदी आरिफ मोहम्मद खान यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तिहेरी तलाख आणि इतर मुस्लिमांच्या निर्णयामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे, तसेच आरिफ खान हा मुस्लिम चेहरा केरळच्या राज्यपालपदावर नेमण्यात आला आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी तमिलसाई सुंदरराजन, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी बंडारु दत्तात्रय आणि तर कमलनाथ मिश्रा यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.