मांजरी – मांजरी बुद्रुक येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची कुर्ला- कर्जत विधानसभा मतदार संघाचा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी ही नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ‘ राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुपर “१००” हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार १०० विधानसभा मतदार संघात युवकांची बांधणी करून पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.तशी घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केली आहे.त्याप्रमाणे राज्यातील ३४ युवक पदाधिकारी यांची मतदार संघांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुर्ला, कर्जत या विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असून पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने काम करण्यात येईल, अशी भावना अजित घुले यांनी व्यक्त केली आहे.