पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी ऍड. देविदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 15 डिसेंबर रोजी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या आदेशाने शिंदे यांची राज्य विधी सल्लागार या पदावर नियुक्ती केली आहे.
याप्रसंगी राज्य समन्वयक नितीन चौधरी, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, विभागीय सचिव छाया कोळी, उपाध्यक्ष अरविंद नाईक, मुंबई विभाग ज्युनियर कॉलेज युनिटचे कोषाध्यक्ष मंगेश पाटील, मुंबई विभाग अल्पसंख्याक युनिट समन्वयक शबाना ठाकूर, मुंबई पश्चिम कार्याध्यक्ष शिर्के व उत्तर मुंबई ज्युनियर कॉलेज युनिटचे सहसचिव अमोल मानकर उपस्थित होते.