बारामती( प्रतिनिधी) : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेवर ६ विश्वस्तांची व २ निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिवनगर विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत. कारखान्याचे चेअरमन उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात. विश्वस्त पदी वसंतराव ऊर्फ बाळासाहेब बापूराव तावरे (माळेगाव), अनिल नानासाहेब जगताप (पणदरे) ,रामदास तुकाराम आटोळे (खांडज) गणपत शंकरराव देवकाते (निरावागज) रवींद्र नामदेवराव थोरात (बारामती) यांची तर तर निमंत्रित सदस्य म्हणून सीमा प्रभाकर जाधव (खांडज) व चैत्राली ज्ञानेश्वर गावडे( मेडद) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.