महिला शिक्षिकांची नियुक्ती स्वत:च्याच शाळेत करा

नगर – महिला शिक्षिकांना निवडणुकीच्या कामातून वगळणे किंवा अपरिहार्य कारणास्तव महिला शिक्षिकांना दिलेल्या नियुक्त्‌या शक्‍यतो त्यांच्याच शाळेवर अथवा शेजारच्या शाळेवर देण्यात याव्यात,दिव्यांग व दुर्धर आजारी तसेच 53 वर्ष वयाच्या पुढच्या कर्मचा-यांना निवडणूक कामातून वगळावे तसेच मतदानाची वेळ संपताच महिला शिक्षिकांना तत्काळ कार्यमुक्त करावे.

या बाबतचे निवेदन शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे,महिला आघाडीच्या मिनाक्षी तांबे, संजय शिंदे,प्रसिद्धी प्रमुख अंबादास गारूडकर,अरविंद जाधव,बाळासाहेब देंडगे,अरूण गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले.

यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा कताना दुर्धर आजार व दिव्यांग शिक्षकांना नियुक्त्‌या दिल्या जाणार नाहीत.महिला शिक्षिकांना कमी प्रमाणात नियुक्त्‌या देऊन शक्‍यतो महिलांना स्वत:च्याच शाळेत नियुक्त्‌या देण्याबाबत विचार केला जाईल.तसेच मतदानाची वेळ संपताच महिला शिक्षिकांना कार्यमुक्त करू असे स्पष्ट अश्‍वासन उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्ठमंडळास दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.