पुणे : रुपी को. ऑपरेटिव्ह बँक दि.1 नोव्हेंबर 2022 पासून अवसायनात आहे. ठेवी परत मिळण्यासाठी ज्यांनी क्लेम अर्ज दाखल केले, अशांना ठेव विमा महामंडळातर्फे पाच लाखांपर्यतची विमासंरक्षित ठेव रक्कम देण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही ठेवीदारांनी याबाबत बॅंकेकडे अर्ज केलेले नाहीत. त्यामुळे अशा ठेवीदारांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत , असे आवाहन बॅंकेचे अवसायक मधुकांत गरड यांनी केले आहे.
ज्या ठेवीदारांना शाखेमध्ये अर्ज देणे शक्य नसेल, अशा ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून (केवायसी, ठेव पावती/पासबुक व ज्या बँकेमध्ये रक्कम जमा करावयाची आहे त्या बँकेचा रद्द केलेला चेक अथवा सदर खात्याचे पासबुक इ.) रजिस्टर पोस्टाद्वारे बँकेच्या मुख्य कचेरी मार्केटयार्ड, गुलटेकडी येथे दि.३१ डिसेंबरपूर्वी पाठवावेत.
तसेच विहीत नमुन्यातील क्लेम फॉर्म बँकेच्या www.rupeebank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ठेवीदारांनी क्लेम फार्म डाउनलोड करून वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह दोन प्रतीमध्ये पूर्तता करून मुख्यकचेरी येथे पोस्टाद्वारे अथवा समक्ष पाठवावेत, असेही, आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.