केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
नारायणगाव (वार्ताहर) – पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी डीपीआर कन्सल्टंटची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
शिरूर मतदार संघातून जाणाऱ्या महामार्गांवर होणाऱ्या विशेषत: पुणे-नगर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत नवी दिल्ली येथे खासदार डॉ. कोल्हे यांनी आज (दि. 11) गडकरी यांची भेट घेत निवेदन दिले. या भेटीत त्यांनी शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर त्यांनी उपाययोजना सुचविल्या.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार करून रस्ता रुंदीकरण केल्यास पुणे-नगर महामार्गावरील वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव या परिसरात रस्ता वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, तसेच त्यांनी पुणे-नाशिक महामार्गच्या संदर्भात कासारवाडी येथील नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याविषयी सविस्तर चर्चा केली.
खेड तालुक्यातील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण आणि एमआयडीसी चौक या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याची मागणी करून नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नी सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.