चंदीगड – दिल्लीहून अटारीला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये 2007 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाच्या तपासात महिला आयपीएस अधिकार भारती आरोरा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्याच आरोरा यांनी आता स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.
पन्नास वर्षीय आरोरा या असा अर्ज करणाऱ्या पहिल्या महिला आयपीएस असून आपल्याला तीन महिन्यांच्या नोटीस पिरीयडमधूनही सुट दिली जावी अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याचे समजते.
आपले उर्वरीत आयुष्य आपल्याला चैतन्य महाप्रभू, मीराबाई आणि कबीरदास यांच्याप्रमाणे श्रीकृष्ण भक्तीत व्यतीत करायचे असल्याचे आरोरा यांचे म्हणणे आहे. पोलीस दलातील सेवा आपल्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा विषय होता असेही त्यांनी म्हटले आहे.