मधल्यावेळी लागणारी भूक

तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तर टी टाईमच्या वेळी लागणारी भूक तुमच्या परिचयाची असेल. लंचनंतर साधारणपणे तीन ते चार तासांनी कामाच्या वेळी अशी भूक जाणवते. काही वेळा खरीखुरी भूक लागली नसली, तरी कामातून ब्रेक मिळावा म्हणून भूक लागल्याचा संदेशही आपल्या मेंदूकडून पाठवला जातो. या भुकेकडे दुर्लक्ष केलं, तर मानसिक ताण वाढतो. उलट काहीतरी जंक फूड खात राहिलं तरीही वजन वाढेल या भीतीने ताण येतो. 

उपाय- 

कामावर जाताना आपल्याजवळ काहीतरी हेल्दी स्नॅक्‍स बाळगा. शक्‍य असल्यास सॅलड, ताजी फळे, थोडे ड्रायफ्रूट किंवा लाह्या असं काही तरी खा. हे खाणे केवळ ताण कमी करण्याकरता आहे, त्यामुळे तेलकट किंवा अनहेल्दी स्नॅक्‍स खाऊ नका.

वेफर्स, सामोसे, वडा पाव किंवा मिठाई टाळा. ज्यूस किंवा ताक असं काही घेतलं तरी चालेल. भरपूर चावून खावे लागतील असे पदार्थ यावेळात खाल्ले, तर थोडंसं खाऊनही भरपूर खाल्ल्याचं समाधान मिळू शकेल आणि मानसिक ताण दूर होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.