#KBC News : केबीसीच्या हॉट सीटवर ‘नीरज चोप्रा आणि श्रीजेश’ची हजेरी

मुंबई – कौन बनेगा करोडपतीफमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती. त्यांनतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागसुद्धा सहभागी झाले होते. यावेळीसुद्धा असेच खास पाहुणे केबीसीमध्ये हजेरी लावणार आहेत. नुकताच शोचा नवा प्रोमो समोर आला आहे.

यामध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा आणि हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश सहभागी झालेले दिसून येत आहेत. नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर केबीसीचा नवा प्रोमो शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे आपल्या देशाचं नाव मोठं करून केबीसीमध्ये येत आहेत.

गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नीरज चोप्रा अनेक मुलाखतींमध्ये दिसून आला आहे. मात्र, “कौन बनेगा करोडपती’मध्ये त्याचे ऍपियरन्स खूपच खास असणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन नीरज आणि श्रीजेशला विचारत आहेत मी तुमच्या मेडल्सना हात लावू शकतो का?

तसेच नीरज चोप्रा अमिताभ यांना हरियाणवी बोलायला शिकवतो. तसेच श्रीजेशने अमिताभ यांना सांगितले की, 2021ने त्याची आणि संपूर्ण संघाची लाईफ बदलून टाकली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.