अकाऊंट नंबरसह आवश्यक वस्तूंची यादीही जाहीर
पुणे – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने नागरिक, नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध प्रकारच्या व्यावसायिक संघटना यांच्या सहकार्याने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये उपासमार होत असलेल्या रोजंदारीवरील कामगारांच्या जेवणाची व्यवस्था क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. याशिवाय औषधोपचार आणि अन्य दैनंदिन गरजाही स्वयंसेवी संस्थांमार्फत पूर्ण केल्या जात आहेत. या अनुषंगाने महापालिकेकडे कमतरता असलेल्या वस्तू आणि यंत्रसामुग्रीची यादी महापालिकेने जाहीर केली असून, त्यासाठी आर्थिक आणि वस्तू रूपात मदत उपलब्ध करून देऊ शकतात. आर्थिक मदतीसाठी महापालिकेने बॅंकेचा अकाऊंट नंबर जाहीर केला आहे.
महापालिकेने पुण्यातील तीन रुग्णांलयात आयसीयू युनिटसह 50 खाटांचे नियोजन केले आहे. पुढील कालावधीत रुग्णांची संख्या वाढल्यास खाटांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेकडे असलेला आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना सुधारित करण्याची गरज आहे. संभाव्य वाढीव रुग्ण आणि महापालिकेकडील उपलब्ध साधनसामुग्री यांची तुलना करता अनेक बाबींची कमतरता आहे.
त्याची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ती सामुग्री आणण्यासाठी महापालिकेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. वस्तू आणि यंत्रसामग्री महापालिकेला उपलब्ध करून देण्यासाठी महापालिक आयुक्त यांचे स्वीय सहायक गजानन कडक यांच्याशी 9689931103 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी…
बॅंक खाते – Municipal Commissioner PMC-COVID 19
खाते क्रमांक – 60355272848
बॅंकेचे नाव – बॅंक ऑफ महाराष्ट्र, पीएमसी शाखा, पुणे
IFSC – MAHB 0001430