‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते; निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई – ‘पीएम मोदी’ या चित्रपटावरून निर्माण होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आता या चित्रपटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठविलेली आहे.

या चित्रपटात मोदींचा त्यांच्या लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.  चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. परंतु लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानंतर याचीच पुनरावृत्ती घडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील लोकसभा निवडणुकीत चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन करू अशी भूमिका घेतली होती. या चित्रपटामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते, असे म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठविलेली आहे. ३० मार्चपर्यंत नोटीसला संबंधितांना उत्तर द्यावे लागणार आहे, असे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीरसिंग यांनी सांगितले.

तर दुसरीकडे ‘पीएम मोदी’ हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे आणि लोकसभेच्या निवडणूक ११ एप्रिल पासून सुरु होत असल्याने, या चित्रपटावर निवडणुकीच्या काळात बंदी आणण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.