रोहित तिवारी हत्या प्रकरण : अपूर्वा तिवारीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली – नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी अपूर्वा शेखरला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी अपूर्वाला दिल्ली न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता न्यायालयाकडून याप्रकरणी अपूर्वा तिवारीला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस सातत्याने अपूर्वा शेखरसह घरातील सहा जणांची चौकशी करत होते. चौकशीनंतर अपूर्वाला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित शेखरच्या हत्येमध्ये अपूर्वाचा सहभाग होता. दिल्ली क्राईम ब्रान्चच्या चौकशीत अपूर्वाने सत्य कथन केले. सातत्याने बदलणाऱ्या अपूर्वाच्या जबाबामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय अधिक वाढला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.