Apurva Nemlekar | अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे. अपूर्वा हरिहरेश्वरला गेली होती, ज्या ठिकाणी तिच्या वडिलांची आणि भावाची अस्थी विर्सजन केलं आहे. त्यामुळे अपूर्वा हरिहरेश्वरला गेल्यानंतर भावुक झाली. हरिहरेश्वर येथील काही फोटो शेअर करत तिने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वा नेमळेकरने पोस्ट करत लिहिले की, “सर्वांनाच माहिती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला कोणाला जमलंय? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरुच आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळणावर फिरून आले.” Apurva Nemlekar |
“श्री. क्षेत्र हरिहरेश्वर (कोंकण दक्षिण काशी) ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाचं अस्थी विसर्जन केलं होतं आणि त्याचं ठिकाणी त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभं राहिल्यावर थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा झाला तेव्हा जणू असं वाटलं की पप्पा आणि ओंकारला घट्ट मिठी मारली आहे. आणि आज या अथांग सागरकिनारी दाटून आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचं सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला आणि मी मनसोक्त रडले…,” असे तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे. Apurva Nemlekar |
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया भावना आपण अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो…परंतू detachment ही एकमेव अशी भावना आहे की ते कोणी शिकवतं नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो…असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं…म्हणजे मन हलक होतं…मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने…लवकरच…”, अशी भावुक पोस्ट अपूर्वाने लिहिली आहे.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत आहे. या मालिकेत तिने उत्कृष्ट खलनायिका साकारली आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकली होती. या पर्वाची ती उपविजेती ठरली होती.
हेही वाचा:
“…तर अमित शहा महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लावतील,” ठाकरे गटातील नेत्याचा आरोप