२७ मार्च ते ३ एप्रिल २०२२ पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : “हाती घ्याल ते तडीस न्याल’ या म्हणीचा अनुभव घ्या. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची घाई असेल. व्यवसायात रोखीचे व्यवहार करताना दक्षता घ्या. चुकीची संगत टाळा. कामात दुर्लक्ष होऊन चूक होणार नाही याची काळजी घ्या. दगदग धावाधाव कमी करा. नोकरीत वरिष्ठांना गृहित धरून कामे करू नका. महत्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. घरात कुवतीपेक्षा खर्च करू नका. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
वृषभ : मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार झाल्याने आकाश ठेंगणे वाटेल. पैशाचा ओघ चालू राहील. त्यामुळे खर्च वाढेल. व्यवसायात नवीन कामे हाती घ्याल. केलेल्या कामात यशाचे प्रमाण वाढेल. कामाच्या स्वरुपात बदल करून फायदा मिळवाल. नोकरीत नवीन ओळखी होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. जोडधंद्यातून लाभ होईल. घरात लांबलेले कार्यक्रम पार पडतील. शुभविवाह ठरतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना गृहसौख्य उपभोगता येईल.
मिथुन : कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस असेल. कधी युक्तीने तर कधी गोड बोलून कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. व्यवसायात वेळ व पैसा योग्य तेथे खर्च करा. कामांना गती व वेळ देण्यासाठी प्रयत्न राहील. जादा भांडवलाची तरतूदरही करून ठेवाल. नोकरीत महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. मनस्वास्थ अनुभवाल. नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील. गृहसौख्याचा आनंद मिळेल. चांगली बातमी हुरूप वाढवेल.
कर्क : सर्व ग्रहांची अनुकूलता उत्साह वाढेल. व्यवसायात ताणतणाव कमी होतील. अपेक्षित कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची स्थितीही सुधारेल. प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून कामातील उत्साह वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ कामानिमित्त जादा सवलती व अधिकार देतील. प्रवास घडेल. ओळखी होतील. घरात स्वत:करिता चार क्षण घालवू शकाल व इतरांनाही त्यात सहभागी करून घ्याल. महिलांची तब्येत चांगली राहील.
सिंह : महत्त्वाचे निर्णय स्वत: घेऊन प्रगती करण्याचा विचार कराल. पण हातून काही चूक घडत नाही ना? याची टोचणीही मनात असेल. तेव्हा सबुरीने वागा. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवा. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. अंथरुण पाहून पाय पसरा. जोडधंद्यातून फायदा मिळेल. नोकरीत स्वच्छंदी जीवन जगण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे जादा काम करणे पसंत नसेल. घरात अत्यावश्यक खर्च कराल.
कन्या : आर्थिक नियोजनात तुमचा हातखंडा असतो. पूर्वी केलेल्या नियोजनाचा आता उपयोग होईल. व्यवसायात पैशाची ऊब मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. निर्णय अचूक ठरतील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत बढती, पगारवाढ इ. सारखी सुविधा मिळेल. नवीन दिशा, नवा दृष्टिकोन जीवनात प्रगती घडवेल. नवीन व्यक्तीच्या सहवासामुळे जीवनात रंगत येईल. तरुणांचे विवाह जमतील. परदेश गमनाची संधी.
तुळ : काम व सुख एकाच वेळी उपभोगण्यासाठी तुमची मनीषा पूर्ण होईल. व्यवसायात अनावश्यक खर्च कमी करून योग्य तेथेच खर्च कराल. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे खुबीने सहकाऱ्यांकडून करवून घ्याल. नोकरीत कामाचा ताण असला तरी काम करण्याचे स्वातंत्र्य असेल. बेकार व्यक्तींना नवीन कामाची संधी मिळेल. विरंगुळ्यात मन रमेल. अंगी असलेल्या गुणांची मदत होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत पार पडतील.
वृश्चिक : जीवनात चांगले घडण्याची आशा निर्माण झाल्याने कामाला हुरूप येईल. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत व सल्ला उपयोगी पडेल. कामांना वेग देण्यासाठी विशेष लक्ष द्याल. नोकरीत कामाचा बाऊ जास्त कराल. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरात ठरलेले शुभकार्य पार पडेल. कला, क्रीडा, राजकारण इ. क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी झोतात राहण्याची संधी मिळेल.
धनु : कामांना अपेक्षित गती आल्याने तुमचे लक्ष इतर गोष्टींकडे केंद्रित कराल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाचे नियोजन करा. यश येईल. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल. वेळ व पैसा याची योग्य सांगड अपेक्षित लाभ घडवून आणेल. नोकरीत वरिष्ठ कामाचा तगादा लावतील. न रागवता जमेल तसे काम संपवा. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. उधार उसनवार देऊ नका. घरात खर्च वाढेल.
मकर : तुम्ही स्वभावाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न कराल व त्यात यशही मिळेल. विचार न करता बिनधास्त जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात नवीन कामाची धुरा सांभाळाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. लांबचे प्रवास होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. मनासारखे काम झाल्याने मानसिक समाधान मिळेल. घरात अंगी असलेल्या गुणांचे कौतुक सर्वजण करतील. अनपेक्षित कामाची शक्यता. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
कुंभ : “जो दुसऱ्यावर विसंबला…’ ही म्हण सार्थ ठरेल. आळशी स्वभाव नडेल. व्यवसायाने कामात शिथिलता येईल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. आर्थिक स्थिती मात्र समाधानकारक असेल. नोकरीत मिळालेली संधी दवडू नका. सजगकृती ठेवा. कामात गुप्तता राखा. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या व इतर व्यक्तींच्या मागण्या मान्य कराल. जीवनाचा आनंद पुरेपूर घ्याल. महिलांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. दुरुस्ती, गृहसजावट यात बराच पैसा खर्च होईल.
मीन :डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे प्रगती साधाल. व्यवसायात दुर्लक्ष झालेल्या कामात लक्ष घालून गती द्या. आवश्यक वाटल्यास महत्त्वाचे निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. आपल्या मागण्या वरिष्ठांचा मूड बघून मान्य करून घ्या. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात प्रकृतीची हेळसांड करू नका. न चिडता सारासार विचार करून कृती करा. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंद जोडीदार भेटेल. महिलांचा वेळ मजेत जाईल.