#AO2021 : मिश्र दुहेरीत क्रेजिकोवाची हॅट्ट्रिक

मेलबर्न – अमेरिकेच्या राजीव राम आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजीकोवा यांनी यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यांचे कारकिर्दीमधील एकत्रित मिळविलेले हे दुसरे मोठे विजेतेपद ठरले. क्रेजिकोवाने या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली.

अंतिम फेरीच्या लढतीत राम-क्रेजीकोवा जोडीने मॅथ्यू एडेन-समंथा स्टोसूर जोडीचा 59 मिनिटात 6-1, 6-4 असा पराभव केला. क्रेजीकोवा हिचे या स्पर्धेतील हे मिश्र दुहेरीतील सलग तिसरे विजेतेपद मिळविले. रामच्या साथीत तिने 2019, तर निकोला मेकटिक याच्यासाथीत गेल्या वर्षी विजेतेपद मिळविले होते. 

महिला दुहेरीत मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कॅटरिना सिनीआकोवा हिच्या साथीत खेळताना त्यांना एलिसे मेर्टेन्स आणि आर्यना सॅबालेन्का यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.