नवी दिल्ली – करोनाच्या ब्रिटन मधील नवीन विषाणुची लागण झाल्याची 71 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्यावतीने आज देण्यात आली. या रोगाचे रूग्ण वाढू लागल्याने त्या विषयी चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
या रूग्णांना स्वतंत्र खोलीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यापासून विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वतोपरी दक्षता घेतली जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाहीं क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या विषाणुंच्या प्रसारावर कटाक्षाने लक्ष ठेवले जात असून त्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीतही आता पुन्हा पुर्ण सतर्कता सर्व विमानतळांवर बाळगण्यात येत आहे.