कोची : करोनामुक्त झालेल्या महिलेचा करोना 19चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. ही महिला अलिकडेच दुबईहून परतली होती.
बरे झालेल्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह येणे हे खरोखरच चिंताजनक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर हा प्रकार पुन्हा लागण झाल्याचा आहे. हे विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचा प्रकार नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कदाचित ही महिला पूर्ण बरी झाली नसावी, अशी शक्यताही काही तजंनी व्यक्त केली आहे. बरे झाल्यानंतरही विषाणूचे अवशेष राहतातच. बरे झाल्यानंतरही शरीरात विषाणूचे अस्तित्व असतेच. मात्र ते संसर्ग करण्याच्या क्षमतेचे रहात नाहीत. ते कमजोर पडलेले असतात, असेही स्पष्ट करण्यात आले.
या महिलेला झालेल्या फेरबाधेचा सखोल अभ्यास करण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.