चिंता वाढतीय! देशात नव्या करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; एका दिवसात 41,649 रुग्णांची भर

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मागील दोन तीन दिवसांपासून पुन्हा नव्या करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 649 नव्या रुग्णांची भर पडली असून 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 23 हजार 810 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 37 हजार 291 लोक करोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

आतापर्यंत देशात करोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख 81 हजार 263 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही आता चार लाख आठ हजार 920 इतकी झाली आहे.

देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 46 कोटी 15 लाख 18 हजार 479 डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 2.27 लाख गर्भवती महिलांना करोनाच्या लसीचा डोस देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.