चिंता वाढली! सातारा जिल्ह्यात नऊ करोनाबाधितांचा मृत्यू

जिल्हा प्रशासनाकडून आणखी उपाययोजना अपेक्षित

सातारा (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात एकूण नऊ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये करोनाबळींवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले होते; परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. करोनाबळी वाढल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत करोनाबळींची एकूण संख्या 1741 झाली आहे.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बनगरवाडी, ता. माण येथील 88 वर्षीय पुरुष, अंबवडे, ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, जावली, ता. फलटण येथील 45 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना लोणंद, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिला व 69 वर्षीय पुरुष, मारी पेठ,

महाबळेश्वर येथील 70 वर्षीय पुरुष, किन्हई, ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, जळगाव, ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, गावडेवाडी, ता. पाटण येथील 44 वर्षीय पुरुष, अशा एकूण नऊ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.