फलटण – फलटण येथील करोनाबाधितांच्या संख्येत आणखी तीनने वाढ झाली असून यामध्ये फलटण तालुक्यातील आसू आणि उपळवे येथील प्रत्येकी एकजणाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील प्रतितयश समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर भागात करोनाचा शिरकाव झाला असून येथील एक जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.
आसू येथील पूर्वी पाॅझिटिव्ह आलेल्या पत्नीच्या निकट संपर्कात आलेल्या ३० वर्षीय पतीची चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. तसेच उपळवे येथील येथील ५२ वर्षीय सारीची लक्षणे असलेल्या पुरुषाचीही चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील ४६ वर्षीय पुरुषाचीही चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.
यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. या बाधितांच्या निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान आज रोजी २ हजार १०६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर करोना केअर सेंटरमधील कन्फर्म वार्डमध्ये २३ तर सस्पेक्ट वार्डमध्ये ६६ जण दाखल आहेत. आज १७ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून २० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.