मुंबई – आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात येत्या शुक्रवारी होत आहे. या सामन्यापूर्वी मुंबई संघाचे यष्टीरक्षण प्रशिक्षक व माजी कसोटीपटू किरण मोरे करोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
किरण मोरे यांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नव्हती. मात्र, आता अहवाल पॉझिटिव्ह ठरल्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे ते पालन करत आहेत. मुंबई इंडियन्सचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे.