पुणे -करोनाच्या तिसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोनाचा प्रसार कमी आहे. त्यात वाढ होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाकडून प्रयत्न करत आहे. मात्र,
सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांमध्ये 21 ते 40 वयोगटातील सुमारे एक हजार तीन रुग्ण आहेत, तर 1 ते 10 वर्ष वयोगटातील 97 मुले बाधित झाले आहेत. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडत असलेल्या नागरिक करोना बाधित होत असल्याचे दिसून येत आहे.
ओमायक्रॉन विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे. मात्र, अजूनही ग्रामीण भागातील सुमारे साडेअकराशे गावे तिसऱ्या लाटेपासून दूर आहेत. त्यांना करोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने करोनामुक्त गाव योजना घोषित केली आहे.
सध्या ग्रामीण भागात सक्रिय असलेल्या रुग्णांमध्ये 21 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. कामानिमित्त बाहेर पडत असलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडत असलेल्या नागरिकांना करोना
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर कारावे. मास्क, सामाजिक अंतर पाळावे तसेच ज्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नाही, त्यांनी तात्काळ लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
वयोगटानुसार सक्रिय रुग्ण पुढीलप्रमाणे-
1 ते 10 वयोगाटील 97 मुले, 11 ते 20 वयोगटातील 243, 21 ते 30 वयोगटातील 639, तर 31 ते 40 वयोगटातील 656 जणांचा समावेश आहे. दरम्यान, 41 ते 50 वयोगटातील 387, 51 ते 60 वयोगटातील 278, 61 ते 70 वयोगटातील 153, 71 ते 80 वय वयोगटातील 103, 81 ते 90 वयोगटातील 21 आणि 90 ते 100 वयोगटातील एक सक्रीय रुग्ण आहे.