डबल सेंच्युरीसाठी विराट कोहलीला अनुष्काच्या खास अंदाजात शुभेच्छा  

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावले असून भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात यश मिळवले आहे. विराट कोहलीच्या या खेळीचे सर्वत्रच कौतुक होत आहे. तर विराटची पत्नी अनुष्का शर्मानेही आपल्या अंदाजात आनंद व्यक्त केला आहे.

अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचा फोटोसोबत हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा शाहरुख खानच्या झिरो चित्रपटात झळकली होती. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविण्यात अपयशी ठरला. अनुष्का शर्मा सध्या नेटफ्लिक्ससोबत फिचर फिल्म ‘बुलबुल’ आणि ‘माई’ या वेबसिरीजची निर्मिती करत आहे.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

Leave A Reply

Your email address will not be published.