लुक्सवरून अनुष्कालाही केले होते रिजेक्ट; वाचा सविस्तर बातमी…

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींनपैकी एक आहे. परंतु, बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी तिलाही स्ट्रगल करावे लागले. 

अनेकदा अनुष्काला तिच्या दिसण्यावरून (लुक्स) रिजेक्शनला समोर जावे लागले आहे. बऱ्याच वेळा असे झाले कि, अनुष्काला सिलेक्ट करण्यात आले आणि शेवटच्या क्षणी रिप्लेस केले गेले. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अनुष्काने करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रिजेक्शन आणि स्ट्रगलवर मनमोकळेपणाने बोलली होती. जेव्हा लोक माझ्यासोबत असे करत होते. तेव्हा मला मानसिक त्रास होत होता, असे तिने सांगितले होते. 

अनुष्का म्हणाली कि, वयाच्या १५ व्या वर्षांपासून मी रिजेक्शन झेलले आहे. पण, मी याबद्दल बोलत नाही. मला अनेकदा शोज् मधून बाहेर काढण्यात आले. कोणत्याही जाहिरातीसाठी सिलेक्ट झाले तर अखेरच्या क्षणी रिप्लेस करण्यात येत होते.

माझ्यासोबतही या सर्व गोष्टी घडल्या आहेत. तो इंडस्ट्रीचा महत्वाचा भाग आहे आणि आयुष्याचाही. परंतु, मी या सर्व गोष्टींना कमी वयात सामोरे गेल्याने याचा मला मानसिक त्रास झाला. लोक तुमच्या कमी वयात लूक्सवरून तुमच्याबद्दल मत बनवतात. हि गोष्ट तुम्हाला आतून खात राहते. परंतु, मी आता यातून बाहेर पडले आहे.

अनुष्काने प्रोड्युसर्स आणि कास्टिंग डायरेक्टर्सच्या कमेंट्सचेही अनुभव सांगितले. ती म्हणाली, मी हुशार आहे. समोरचा माणूस काय उद्देशाने बोलत आहे हे आपल्याला समजते. तुमचा लुक ठीक नाही, असेही समोरचे म्हणू शकतात. ज्या प्रकारे मला रिजेक्ट केले जायचे तो खूप वाईट अनुभव होता, असेही अनुष्काने सांगितले. 

दरम्यान, अनुष्का शर्माला जानेवारीत कन्यारत्न झाले असून वामिका असे तिचे नाव आहे. अनुष्का शेवटची ‘झिरो’ चित्रपट झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकला  नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.