मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकली अनुष्का

मुंबईमध्ये पाऊस कोसळायला लागला की प्रत्येक गल्लीबोळात पाणी तुंबून राहते. त्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिक जामचा त्रास सर्वसामान्य नागरिकांबरोबर सिनेस्टारनाही होतो. अनुष्का शर्माही अशीच ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडली. त्या अवस्थेतील आपला एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. सकाळी सकाळी ती बाहेर जायला निघाली होती. पण तुंबलेल्या पाण्यामुळे ती ट्रॅफिकमध्ये अडकून पडली. तिने कारमध्ये बसल्या बसल्या स्वतःचा एक व्हिडीओ बनवला आणि पोस्ट केला.

या व्हिडीओबरोबर तिने ट्रॅफिकचा एक फोटोही पोस्ट केला आहे. “आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आपण कौतुक करतो. त्यामध्ये ट्रॅफिकचाही समावेश होतो का ?’ हा प्रश्‍न आपल्या एका मित्रासाठी आपण विचारत असल्याचेही तिने म्हटले आहे. अलिकडेच शाहरुख आणि कतरिनाबरोबर तिने केलेला “झिरो’ अगदी फ्लॉप ठरला होता.

सध्या तरी अनुष्काकडे कोणताही सिनेमा नाही. इतर सिनेमांच्या ट्रॅफिक जाममधून तिला रस्ता सापडत नसावा. ती डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक ओरिजिनल वेब सिरीज प्रोड्युस करते आहे, असे समजले आहे. मात्र त्यातही तिला मुंबईतल्या ट्रॅफिक जामचा अडथळा आला. या ट्रॅफिक जाममधून बाहेर पडून तिला यशाच मार्ग लवकरच सापडेल, अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.