मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनुष्काला उप्स मुव्हमेंटचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळते. सर्वसामान्यांनी अनुष्काला या फोटोवरून चांगलेच टट्रोल करायला सुरुवात केली आहे. मात्र आम्ही तुमहाला या फोटो बाबतची खरी माहिती देणार आहोत.
‘रब ने बना दी जोडी’मधून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी अनुष्का साडी नेसून एका फंक्शनला गेली होती. जिथे अनुष्काला तिच्या ब्लाउजच्या नेकमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. ज्यामध्ये अनुष्काचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. परंतु आता हे फोटो फेक असल्याचे समोर आले आहे. त्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यावरून व्हायरल फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अनुष्का शर्माने सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती सुंदर दिसत होती. अभिनेत्रीचा बॅकलेस ब्लाउजही तिच्यावर खूप सुदर दिसत होता. पण या फंक्शननंतर अनुष्काचे अनेक फेक फोटो व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये अभिनेत्रीने खूप खोल गळ्याचा ब्लाउज घातल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की अभिनेत्रीला कोणत्याही उप्स मुव्हमेंटला सामोरे जावे लागले नव्हते. तसेच अभिनेत्रीने कोणताही बोल्ड लूक यावेळी केला नव्हता हे देखील व्हिडीओ पाहून समजते. त्यामुळे व्हायरल फोटो हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आता ती लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ आणि ‘कानेडा’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अनुष्का ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती.