मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतीच तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली. तिच्या घरी पाळणा हालणार असल्याने सगळ्या चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर झाला. गरोदरपणात अनेकांना अनेक नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. तशीच इच्छा अनुष्कालाही झाली आहे.
अनुष्का सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सध्या दुबईत असल्याने ती भारतातील नवरात्रोत्सव मिस करताना दिसली. सोशल मीडियावर नवरात्रीच्या नैवेद्याचा फोटो शेअर केला होता.
दरम्यान, प्रेग्नंट असल्याने तिला अनेक नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाली. ती इच्छा तिने फोटो शेअर करत पुर्ण केली. सध्या आयपीएल सिझन जोमान सुरु आहे. त्यासाठी विराट कोहली दुबईत आहे. त्याच्यासोबतच अनुष्काही दुबईत मॅटर्निटी डेज एन्जॉय करत आहे.
दरम्यान, ती सतत सोशल मीडियावर बेबी बम्प दिसणारे नवनवीन फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर चााहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.