अनुष्का शर्मा नेहमी आपल्या रोलमधून प्रेक्षकांना काही ना काही सरप्राईज देत असते. यापूर्वी “परी’मध्ये ती भूत झाली होती. तर “सुई धागा’मध्ये अगदी छोट्या शहरातील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीचा रोल तिने साकारला होता.
आता प्रथमच ती पोलिस अधिकाऱ्याच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. तिचा पोलिस युनिफॉर्ममधील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हा गेटअप तिच्या नवीन सिनेमातील लुकचा असेल असे अनेकांना वाटू शकते. मात्र हा गेटअप अनुष्काने एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी केला आहे.
या जाहिरातीत पोलिस बनलेली अनुष्का एका घरावर छापा घालताना दिसणार आहे. ही जाहिरात खूपच मजेशीर आणि भन्नाट असणार आहे, याचा अनुभव प्रेक्षकांनी स्वतःच घ्यायला हवा. “झिरो’पूर्णपणे फ्लॉप ठरल्यावर अनुष्काने पुढील प्रोजेक्टसाठी कोणतीही घाई केलेली नाही.
या काळात तिने आपल्या फॅमिली लाईफला भरपूर वेळ दिला आहे. लवकरच ती आपल्या पुढच्या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे. आता तरी तिला नवीन स्क्रीप्टचा अभ्यास करायचा आहे. तिच्या नव्या सिनेमासठी स्क्रीप्ट महत्वाची असणार आहे, हे तिने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.